सकाळ डिजिटल टीम
नुकतीच देशातील सर्वात जास्त कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये शाहरुख खानने बाजी मारली आहे.
या यादीत बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील सर्व टॉप स्टार्सची नावे आहेत. या यादीतील टॉप 5 मध्ये अमिताभ बच्चन, थलपथी विजय आणि सलमान खान यांसारख्या बड्या स्टार्सची नावे आहेत.
पहिल्या क्रमांकाबद्दल बोलायचे झाले तर या यादीत बॉलीवूडचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. शाहरुखने 92 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे.
थलपथी विजय दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्याने 80 कोटी रुपयांचा कर भरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर सलमान खान आहे, त्याने 75 कोटींचा कर भरला आहे.
चौथ्या क्रमांकावर 71 कोटींचा कर भरणारे अमिताभ बच्चन आणि पाचव्या क्रमांकावर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे नाव आहे.
अजय देवगण याने 42 कोटी रुपये कर भरला आहे आणि महेंद्रसिंग धोनीने 38 कोटी रुपये कर भरला असून तो सातव्या क्रमांकावर आहे.
त्यानंतर अभिनेता रणबीर कपूरने 36 कोटींचा कर भरला आहे. दरम्यान, हृतिक रोशनने 28 कोटी रुपये कर भरला आहे.
टॅक्स भरणाऱ्या टॉप 10 सेलिब्रिटी मध्ये एकच मराठी माणूस आहे. तो म्हणजे सचिन तेंडुलकर त्याने 28 कोटी रुपये कर भरला आहे.