Safe Driving Tips : ड्रायव्हिंग करताना 'या' गोष्टी टाळा, अन्यथा…

सकाळ डिजिटल टीम

गाडी चालवताना आपण अशा चुका करतो ज्यामुळे अनेकदा आपला जीव जातो

safe driving tips

आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यांमुळे तुम्ही गाडी चालवताना अपघाताला बळी पडू शकता.

safe driving tips

गाडी चालवताना मोबाईलचा वापर केला तर आपण आपली सुरक्षितता तसेच इतरांची सुरक्षा धोक्यात घालतो.

safe driving tips

हायवेवर गाडी चालवताना, तुमचा वेग वारंवार बदलणे टाळा, एकसमान वेगाने गाडी चालवा जेणेकरुन वाहन नेहमी तुमच्या नियंत्रणात असेल.

safe driving tips

महामार्गावर वारंवार लेन बदलल्याने तुम्हाला तसेच इतर वाहनांना अपघाताचा धोका असतो

महामार्गावरच नाही तर प्रत्येक रस्त्यावर तुम्ही समोरच्या वाहनापासून योग्य अंतर राखले पाहिजे.

वाहन चालवताना नेहमी योग्य इंडिकेटरचा योग्य वेळी वापर करा, जेणेकरून तुम्हा आणि इतरही सुरक्षित राहतील.

तुम्ही गाडी चालवत असाल तर कधीही हेडफोन वापरू नका, यामुळे तुमचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

गाडीत मोठमोठ्याने म्युझिक वाजवल्याने चालकांना इतर वाहनांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही, हे धोकादायक ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.