Anuradha Vipat
‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री सई लोकूर घराघरांत लोकप्रिय झाली.
लग्नाच्या ३ वर्षांनंतर सईने डिसेंबर २०२३ मध्ये एका गोड मुलीला जन्म दिला.
गरोदरपणात तिचं वजन काहीसं वाढलं त्यामुळे सध्या सई शेअर करत असलेल्या पोस्टवर तिला वजन कमी करण्याचे सल्ले देऊन नेटकरी ट्रोल करत आहेत.
यावर आता पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.
आता सईने पोस्ट शेअर केली आहे. सईने लिहिले आहे, “लोकांना जाड आणि बारीक यापलीकडे काहीच दिसत नाही का?
आपण कोणत्या प्रकारच्या मानसिकतेत राहत आहोत? एकमेकांना पुढे घेऊन जाण्याऐवजी आपण एखाद्याला खाली खेचत आहोत.” अशी संतप्त पोस्ट सई लोकूरने शेअर केली आहे.