प्रणाली मोरे
सई ताम्हणकरनं पैठणी साडीत केलेला पारंपरिक साजशृंगार सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
केसाचा बन..त्याभोवती पांढराशुभ्र मोगऱ्याचा गजरा...नाकात नथ,गळ्यात हार..हातात हिरव्या बांगड्या असा साज केलेली सई सुंदरच दिसत आहे.
सोशल मीडियावर सईच्या या साडीतील फोटोंवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहेत. तिच्या हातात हिरवा चु़डा पाहिल्यांनं तिच्या लग्नाच्या चर्चेलाही उधाण आलंय.
सईनं साडीतले फोटो पोस्ट करत 'सालस' असं कॅप्शन त्याला दिलं आहे.
सईच्या या कॅप्शनवर एका चाहत्यानं मुद्दामून छेडत सईला प्रती प्रश्न केला आहे, 'सालस म्हणजे काय?'
सई नेहमीच ग्लॅम डॉल अवतारात दिसते. पण तिच्या वेस्टर्न आणि इंडियन एथनिक असे दोन्ही पेहराव उठूनच दिसतात.
सईनं मराठीच नाही तर बॉलीवूडमध्येही आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.