Sant Gadage Baba: दीनदुबळ्यांमध्ये देव शोधणाऱ्या संत गाडगेबाबांचे जुने फोटो

Sandip Kapde

राष्ट्रसंत गाडगे महाराज

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे.

sant gadage maharaj old photo

संत गाडगे बाबा 

संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेणगाव या गावी झाला. त्यावेळी महाराष्ट्राच अज्ञान, अंद्धश्रद्धा, अत्याचाराचे डोंगर उभे होते.

sant gadage maharaj old photo

झिंगराजी

वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखूबाई होते तर आडनाव जाणोरकार होते. तर त्यांना सर्व डेबूजी म्हणत.

sant gadage maharaj old photo

गोधडे महाराज

ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा वेश करत असल्यामुळे लोक त्यांना ‘ गोधडे महाराज ’ किंवा  ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच ओळखत असत.

sant gadage maharaj old photo

विवाह

१९१२ मध्ये त्यांचा विवाह कुंताबाईशी विवाह झाला पण समाज सेवेची गोडी असल्यामुळे त्यांचे कधीच संसारात त्यांचे मन रमले नाही.

sant gadage maharaj old photo

अंधश्रद्धा

पुढे काही वर्षांनी ते घरदार सोडून तिर्थयात्रा करू लागले. समाजातील अज्ञान, चुकीच्या चालीरीती, रुढी परंपरा व अंधश्रद्धा दूर करण्याचे त्यांनी ठरविले. पुढे गाडगेबाबा गावोगावी फिरू लागले.

sant gadage maharaj old photo

संत गाडगेबाबा

ज्या गावात संत गाडगेबाबा जात, ते गाव हाताती खराट्याने स्वच्छ करत व संध्याकाळी गावातील लोकांच्या मनातील घाण किर्तनाच्या माध्यमातून स्वच्छ करत अशा प्रकारे त्यांनी स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले

sant gadage maharaj old photo

महाराष्ट्र

एवढंच काय तर महाराष्ट्र व्यतिरिक्त  गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगावी कीर्तने करून लोकजागृती केली. 

sant gadage maharaj old photo

‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून देत असत.

sant gadage maharaj old photo

भूतदया

स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे.

sant gadage maharaj old photo

देवदर्शन

तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात होते. परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करत.

sant gadage maharaj old photo

खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता.

sant gadage maharaj old photo

चटणी- भाकरी

श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.

sant gadage maharaj old photo

धर्मशाळा

पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या.

sant gadage maharaj old photo

लक्ष्मीनारायण

विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sant gadage maharaj old photo