Monika Lonkar –Kumbhar
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड प्रोग्रॅम’च्या माध्यमातून आज आणि उद्या नवी मुंबईत ‘श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात १८ संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा सोहळा सुरू झाला आहे.
पादुका दर्शन सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून गुरुसेवक सज्ज असणार आहेत.
पादुका दर्शनासाठी येणाऱ्या गुरुसेवकांची पादत्राणे ठेवण्यासाठी मंडपाबाहेर विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे पादत्राणे काढून पाय धुऊन झाल्यावर मंडपात प्रवेश करता येईल.
साधकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था ठिकठिकाणी केलेली आहे. दर्शन झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सोहळ्यात भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्टॉल आणि स्वच्छतागृहांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या सोहळ्यासाठी भाविकांना विनामूल्य प्रवेश असून नोंदणी करणे आवश्यक आहे. श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी एका रांगेत तीन याप्रमाणे सहा विभाग करण्यात आले आहेत. तिथे १८ पादुका ठेवण्यात आल्या आहेत.
ज्यांची नोंदणी झालेली नाही त्यांनी नोंदणी कक्षात नोंदणी करणे आवश्यक आहे. तेथे भाविकांच्या मदतीसाठी गुरुसेवक असतील. नारळ आणि फुलांच्या स्टॉलचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
नोंदणीनंतर मुख्य मंडपात प्रवेश करता येईल. बाजूलाच हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. पादुका दर्शन घेतल्यानंतर उजव्या बाजूला चिंतन, मनन कक्ष तयार करण्यात आला आहे.
पुढे लक्ष्मी मार्ग, कर्मयोग मार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग असे विभाग आहेत.
पुढील भागात फॅमिली गाईड प्रोग्रॅमबाबत माहिती देणारे पाच स्टॉल आहेत.
कॉन्सर्ट हॉलमध्ये सांगीतिक कार्यक्रम होतील. धुनी प्रज्ज्वलन आणि अग्निहोत्र विधीही होणार आहेत.