Pranali Kodre
क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडू अविश्वसनीय विक्रम करताना दिसतात.
मात्र, बहुतेकदा कोणत्याही खेळातील खेळाडूची कारकिर्द ही साधारण 35 ते 40 वर्षांपर्यंत असते. काहीजण कमालीचं कौशल्य दाखवत त्यानंतरही काहीकाळ खेळतात.
याव्यतिरिक्त अनेक क्षेत्रातही निवृत्तीचं वय हे 55 ते 60 च्या दरम्यान आहे.
पण, जर तुम्हाला असं सांगितलं तर की एक अशी क्रिकेटपटू आहे जिचं आंतरराष्ट्रीय पदार्पणनच 66 व्या वर्षी झालं आहे.
हो हे खरं आहे. सॅली बार्टन नावाच्या महिला क्रिकेटपटूने 66 वर्षे आणि 334 दिवस वय असताना जिब्राल्टरकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
23 मे 1957 साली जन्मलेल्या सॅली बार्टनने जिब्राल्टरकडून एस्टोनियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील 21 एप्रिल 2024 झालेल्या सामन्यांतून पदार्पण केले.
सॅली बार्टन यष्टीरक्षक फलंदाज आहे. मात्र तिला पहिल्या सामन्यात फलंदाजी किंवा गोलंदाजीची संधी मात्र मिळाली नाही.
दरम्यान, यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वय असताना पदार्पण करण्याचा विश्वविक्रम पोर्तुगालच्या अकबर सैय्यदचा विक्रम मोडला आहे. ज्यांनी 2012 मध्ये 66 वर्षे 12 दिवस वय असताना पदार्पण केले होते.