Salman Khan : 'भाईजान तू चूकलास'!

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही मनोरंजन वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय रियॅलिटी शो म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या बिग बॉस ओटीटी २ ला सुरुवात झाली आहे.

Salman Khan

८ जुलै रोजी या मालिकेचा एक एपिसोड टेलिकास्ट झाला. त्यावेळी बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं वेगळ्याच रुपात दिसला. त्यावरुन त्याला अनेकांनी ट्रोल केले आहे.

Salman Khan

बिग बॉस हा नेहमीच ओटीटीवर चर्चेत राहिला आहे. याशिवाय मुळ बिग बॉसला टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

Salman Khan

बिग बॉसमध्ये असणारे स्पर्धक, त्यांच्यातील वाद आणि संघर्ष हा टीव्ही मनोरंजन विश्वाच्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून आले आहे. यंदाचा बिग बॉस ओटीटी हा देखील चर्चेत आला आहे.

Salman Khan

सलमान बिग बॉसच्या सेटवर सिगारेट ओढत असल्याचे दिसून आले.त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.

Salman Khan

काही नेटकऱ्यांनी सलमानवर चांगलीच टीका केली आहे. दुसऱ्यांना नेहमी अक्कल शिकणारा भाईजान कसाही वागला तरी चालतो का...असा प्रश्न अनेकांनी केला आहे.

Salman Khan

सलमानच्या चाहत्यांना देखील त्याचे हे वागणे आवडलेले नाही. यापूर्वी देखील सलमान त्याच्या अशाप्रकारच्या कृतीमुळे चर्चेत आला होता.

Salman Khan

सलमान आम्हाला तुझ्याकडून अशाप्रकारची अपेक्षा नाही. तू एवढा मोठा अभिनेता आहेस आणि तू असा वागतो आम्हाला हे काही आवडलेलं नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan