Anuradha Vipat
सलमान खानसाठी २०२३ हे वर्ष खूप खास ठरले आहे. त्याचा 'टायगर 3' हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. सलमानच्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.
सध्या सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याच्या 'द बुल' या नव्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.
'द बुल' या चित्रपटाशी संबंधित अनेक बातम्या सध्या चर्चेत आहेत, त्यापैकी एक बातमी म्हणजे सलमान खानने त्याच्या लूकवर प्रयोग केल्याची बातमी देखील व्हायरल होत आहे.
सलमान खान त्याच्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतो, ज्यासाठी सलमान खूप मेहनत करतो.
अलीकडेच मीडियामध्ये बातमी आली होती की सलमान 'द बुल' चित्रपटासाठी वजन कमी करणार आहे.
या चित्रपटातील भूमिकेसाठी तो स्वत:ला फिट होण्यासाठी सर्किट ट्रेनिंग आणि पॅरामिलिटरी ट्रेनिंगही घेणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.