सकाळ डिजिटल टीम
Samsung कधीच आपल्या वापरकर्त्यांना निराश करत नाही. मग ते मोबाईलचे असो किंवा स्मार्टवॉचचे! कंपनी आता नवीन AI वॉच लाँच करत आहे.
Samsungच्या येत्या गॅलॅक्सी वॉच सिरीजमध्ये अनेक नवीन AI आधारित हेल्थ ट्रॅकिंग वैशिष्ट्ये असणार आहेत.
तुमच्या झोपेचा डाटा, हृदय गती आणि ऍक्टिव्हिटी मोजून तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती देणारा 'एनर्जी स्कोअर' एक नवीन फीचर आहे.
तुमच्या आरोग्य ध्येयावर आधारित माहिती, प्रेरणादायक टिप्स आणि मार्गदर्शन देऊन तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करणारा AI फीचर आहे.
झोपेत तुमची हालचाल, हृदय गती, श्वास घेण्याचा दर आणि झोप लागण्याचा वेळ यासारखी माहिती देणारे सुधारित स्लीप ट्रॅकिंग अल्गोरिदम.
सायकलिस्टसाठी त्यांच्या हृदय गतीवर आधारित माहिती देणारा हा एक नवीन फीचर आहे.
तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या व्यायामांची एकत्रीकरण करून पर्सनल वर्कआउट अनुभव देणारा हा फीचर आहे.
ही वैशिष्ट्ये येत्या गॅलॅक्सी वॉच सिरीजवर उपलब्ध असतील तरी काही गॅलॅक्सी वॉच वापरकर्ते जूनमध्ये बेटा व्हर्जनमध्ये त्यांचा अनुभव घेऊ शकतात.
गॅलॅक्सी वॉच ७ सिरीज १० जुलैला पॅरिसमध्ये होणाऱ्या गॅलॅक्सी अनपॅक्ड कार्यक्रमात लाँच होण्याची शक्यता आहे.