Skin Care : रूप निखारे चंदन, त्वचेवर चंदन लावण्याचे एवढे फायदे

सकाळ डिजिटल टीम

गुणकारी चंदन

चंदनामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक सारखे गुणधर्म आहेत. त्यामुळे चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी चंदन पेस्ट लावावी.

Sandal Powder Benefits

टॅनिंगपासून बचाव

उन्हाळ्यात टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा चंदनाची पेस्ट लावावी. दही, लिंबू, चंदन आणि मधाची पेस्ट बनवून चेहऱ्यावर अर्ध्या तासापर्यंत ठेवा.

Sandal Powder Benefits

पिंपल्स दूर करतात

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी चंदन फार फायदेदायी आहे. चंदन पावडर हळद आणि गुलाब जल मिक्स करून ते पिंपल्सवर लावा.

Sandal Powder Benefits

अँटी एजिंग

वाढत्या वयात चेहऱ्याला तरुण आणि नीट ठेवण्यासाठी चंदन पेस्ट लावा. चंदनात दही किंवा गुलाब जल लावल्याने तुम्ही त्वचा तरुण ठेवू शकता.

Sandal Powder Benefits

डार्क स्पॉट्स

चंदन पावडरमध्ये दूध आणि हळद मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि धब्बे दूर होतात. थंड चंदन तुमच्या चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्समधून तुम्हाला आराम देऊ शकतो.

Sandal Powder Benefits

सनबर्नपासून बचाव

उन्हाळ्यात सनबर्नच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी आणि चेहऱ्याला थंडावा देण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो. चंदनात पाणी किंवा गुलाब जल मिक्स केल्यास गर्मीमध्ये चेहऱ्याला आराम मिळतो.

Sandal Powder Benefits

चेहऱ्यावरील ग्लो

चंदन आणि संत्र्याच्या सालापासून बनलेल्या पावडरचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandal Powder Benefits