Monika Lonkar –Kumbhar
आयुर्वेदामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत, ज्या त्वचेचे सौंदर्य उत्तम प्रकारे राखण्यास मदत करतात.
दीर्घकाळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदनाच्या तेलाचा वापर केला जातो.
आयुर्वेदामध्ये चंदनाला त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. चंदनाच्या तेलाचा वापर त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.
चंदनाच्या तेलाचा वापर केल्याने त्वचा उजळण्यास मदत होऊ शकते.
चंदन हे नैसर्गिकरित्या थंड असते. त्यामुळे, मुरूम, पिंपल्स आणि चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करण्यासाठी चंदनाचे तेल उपयुक्त ठरते.
उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन होण्याचा धोका असतो. यापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही चंदनाचा वापर करू शकता.
चंदनाच्या तेलाचा वापर केल्याने त्वचा सैल होत नाही, उलट चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात.