Anuradha Vipat
नुकताच अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान झाल्यानंतर आता संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने अशोक सराफ यांचा गौरव होणार आहे.
नुकतीच संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
तब्बल पाच दशकांहून अधिक अशोक सराफ यांनी मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्वात देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे
म्हणूनचं नाट्यक्षेत्रातील या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना आता ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
मराठी मनोरंजन विश्वासोबतच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते अशोक सराफ यांना ‘अभिनय सम्राट’ म्हटले जाते