Aishwarya Musale
गेल्या अनेक दिवसांपासून शोएब मलिक - सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अशातच शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चांना एकच उधाण आलं. शोएबने अभिनेत्री सना जावेदसोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले.
शोएब मलिक - सानिया मिर्झा या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली? दोघांच्या पहिल्या भेटीत नेमकं काय झालं होतं? जाणून घेऊया
एका पाकिस्तानी शोमध्ये इंटरव्ह्यूमध्ये शोएब आणि सानियाने काही गोष्टी शेअर केल्या होत्या. शोएबने सांगितलं की, ते दोघे 2003 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा सानियाने त्याला बिलकूल भाव दिला नव्हता.
त्यावेळी क्रिकेटर्सची इमेज कशी होती, सर्वांना माहित होतं. त्यामुळे आम्ही गप्प बसत होतो, असं सानियाने म्हटलं होतं. त्यांच्यात पुन्हा बोलणं 2009 मध्ये सुरू झालं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या होबार्टमध्ये ते एकमेकांना भेटले. संवाद सुरू झाला आणि लग्नापर्यंत पोहचला.
शोएब आणि सानियाचं लग्न १२ एप्रिल २०१० मध्ये पारंपारिक पध्दतीने हैद्राबादमध्ये झालं होतं. त्यानंतर ८ वर्षांनी २०१८ मध्ये त्यांचा मुलगा इजहान मिर्झा मलिकचा जन्म झाला.
एकमेकांच्या कल्चरमुळे काही अडचणींविषयी सानिया म्हणाली होती की, सुरुवातीला त्रास झाला कारण मी हैद्राबादी आणि शोएब पंजाबी वातावरणात वाढलेला आहे.
जेव्हा पण भारत-पाक मॅच असते तेव्हा तू कोणाला सपोर्ट करतेस? असा सानियाला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने उत्तर दिलं. सामना भारताने जिंकावा, पण माझ्या नवऱ्याचं शतक व्हावं, असं ती म्हणाली.
त्यानंतर सामना असतो, तेव्हा तू सोफ्यावर बसून रहा, असा सल्ला देखील सानिया शोएबला देते, असंही ती म्हणाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.