एक लाजरा न साजरा मुखडा! संजनाच्या सौंदर्यावर बुमराह पुन्हा क्लिन बोल्ड

सकाळ डिजिटल टीम

अँकर, पत्रकार...

जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना गणेशन हिचा जन्म ६ मे १९९१ मध्ये झाला. ती भारतीय क्रीडा पत्रकार , अँकर आणि प्रेझेंटर आहे.

मॉडेल म्हणून सुरूवात

संजनाने तिच्या व्यावसायिक कारकिर्दीला मॉडेल म्हणून सुरुवात केली आणि ती स्टार स्पोर्ट्स चॅनेलची प्रेझेंटर आहे आणि बॅडमिंटन स्पर्धांदरम्यान विशेष शो होस्ट केले आहेत.

वर्ल्ड कप स्पर्धेची प्रेझेंटर

संजनाने इंग्लंडमधील २०१९ चा वर्ल्ड कप, २०२० महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०२४ चा पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रेझेंटर म्हणून काम केले आहे.

IPL चा अनुभव

इंडियन प्रीमियर लीग दरम्यान अनेक हंगामांसाठी संजना गणेशन स्टार स्पोर्ट्सच्या प्रसारण टीमचा देखील भाग आहे.

शालेय शिक्षण

संजना गणेशनचे शालेय शिक्षण बिशप स्कूलमध्ये पूर्ण केले. यानंतर तिने सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथून बी.टेक. पूर्ण केले.

मिस इंडिया फायनलिस्ट

संजना गणेशन ही माजी मिस इंडिया फायनलिस्ट आहे आणि ती २०१४ मध्ये MTV च्या स्प्लिट्सविलामध्ये देखील सहभागी झाली होती.

३ वर्षांपूर्वी बुमराहशी विवाह

१५ मार्च २०२१ रोजी संजनाने गोव्यात भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहशी लग्न केले. ४ सप्टेंबर २०२३ रोजी या जोडप्याने मुलगा अंगदचे स्वागत केले.

Wimbledon 2024 carlos alcaraz Barbora Krejcikova dance | sakal
हे पण वाचा