सकाळ डिजिटल टीम
भाऊ-बहिणीचं नातं इतरां नात्यांपेक्षा कमी नसतं, ‘टॉम-जेरी’सारखे भांडता आणि एकमेकांवर खूप प्रेम करता, असं अनेकदा म्हटलं जातं.
‘कडक सिंग’ या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयासाठी खूप प्रेम मिळालेल्या संजना सांघीचे तिचा मोठा भाऊ सुमेर सांघीशी असेच नाते पहायला मिळत आहे.
संजनाच्या भावाचा नुकताच वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्ताने संजनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे,
‘‘लहानपणी रूम शेअर करणे, आईस्क्रीमसाठी भांडणे आणि एकमेकांसोबत वेळ घालवणे, आता चांगले मित्र बनून एकमेकांना समजून घेणे, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुझ्यासारखा समजूतदार, दयाळू आणि त्रासदायक भाऊ असल्यामुळे मला तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळते. वाढदिवसाच्या शुभेच्छा सुमेर.’’
२०११ मध्ये आलेल्या ‘रॉकस्टार’मधून संजनाने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.
संजना सांघीला खरी ओळख ‘हिंदी मीडियम’मधून मिळाली.
‘दिल बेचारा’मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत संजनाला मुख्य भूमिका मिळाली.
अभिनयासोबतच संजना सोशल मीडियावरही सक्रिय असते, ती विविध जाहिराती आणि ब्रँड प्रमोशनमध्येदेखील सक्रिय आहे.