Anuradha Vipat
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे
वैयक्तिक आयुष्यात संकर्षण दोन चिमुकल्यांचा बाबा आहे.
संकर्षणने फादर्स-डे दिवशी बाबा होण्याचा अनुभव सांगितला आहे
संकर्षण म्हणाला, “मी दोन जुळ्या मुलांचा बाबा आहे. २७ जूनला त्यांना ३ वर्ष पूर्ण होतील. बाबा म्हणून संयम काय असतो हे मी शिकलो आहे.
पुढे संकर्षण म्हणाला, आधी मी जितका अधीर होतो तितका राहिलो नाही. कारण लहान मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं अतिशय संयमाचं काम आहे, ते कुठल्या क्षणी काय मागतील, कसे वागतील, कसे पाहतील आणि काय करतील याचा काहीच नेम नसतो.
पुढे संकर्षण म्हणाला, तुम्ही थकलेले असाल, तुम्ही काम करून घरी आलेले असाल, वेगळ्या विचारात असाल तरी त्याच्यावर तुम्हाला रागवून रिऍक्ट करण्याची परवानगीदेखील नाही.
संकर्षण कऱ्हाडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या शोमध्ये पहिल्यांदाच परीक्षक म्हणून दिसणार आहे.