Anuradha Vipat
अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वयात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे
सारा फक्त तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
सारा करीना कपूर हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील सारा कायम चर्चेत असते. आता एका मुलाखतीत खुद्द साराने वडिलांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल वक्तव्य केलं आहे
एका मुलाखतीत सारा म्हणाली होती की, इतके वर्ष झाले आहेत माझे वडील आणि करीनाचं लग्न झालं आहे. अनेक जण कायम मस्करीत म्हणतात की, करीना तुझी नातेवाईक असावी अशी तुझीच इच्छा होती. कारण पहिल्यापासून मी करीनाची फार मोठी चाहती आहे.
पुढे सारा म्हणाली होती की,करीना कधी माझी आई होण्याचा प्रयत्न करत नाही आणि मी कधी दुसऱ्या आईच्या शोधात नव्हती.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान आणि करीना कपूर खान यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.