Anuradha Vipat
अभिनेत्री सारा अली खानची आई अमृता सिंह हिंदू आहे, तर तिचे वडील सैफ अली खान मुस्लीम आहेत.
आता साराने एका मुलाखतीत तिच्या कुटुंबाबद्दल एक मोठं विधान केलं आहे.
एका धर्मनिरपेक्ष कुटुंबात जन्म झाला, त्यामुळे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्याविरोधात मी बोलते. पण अनावश्यक ठिकाणी बोलायला आवडत नाही, असं साराने सांगितलं आहे
लोक तिच्या धर्मावरून टीका करतात, प्रश्न विचारतात याबद्दलही अभिनेत्रीने तिचं मत मांडलं आहे.
धार्मिक श्रद्धांबद्दल तिला कोणीही काहीही म्हटलं तर फरक पडत नाही, कारण ते तिचे निर्णय आहेत, असंही साराने सांगितलं आहे
नुकताच साराचा ‘मर्डर मुबारक’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला, लवकरच ती ‘ए वतन मेरे वतन’मध्ये दिसणार आहे.