Anuradha Vipat
सध्या सारा अली खानच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत.
साराच्या लग्नासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सारा अली खानचा एका श्रीमंत उद्योगपतीसोबत साखरपुडा झाल्याचं समोर आलं आहे.
व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार, सारा अली खान तिच्या आगामी 'मेट्रो इन दिनों'या चित्रपटाच्या शूटिंगनंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात करणार आहे.
पोस्टमध्ये म्हटलं आहे,"मी याआधीही सांगितलं आहे. त्यावेळी माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. पण साराचा साखरपुडा पार पडला आहे आणि दोन वर्षाच्या आत ती लग्नबंधनात अडकणार आहे.
या व्हायरल पोस्टवर सारा अली खान किंवा तिच्या कुटुंबियांनी काहीही माहिती दिलेली नाही.