स्त्री 2मधील सरकटा साकारणाऱ्या अभिनेत्याला पाहून येईल अंगावर काटा , शूटिंग दरम्यान कलाकारही घाबरले

kimaya narayan

स्त्री 2

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री 2 हा सिनेमा खूप गाजतोय. 500 करोडचा टप्पा या सिनेमाने गाठला आहे.

सरकटा

या सिनेमातील सरकटा ही भूमिका खूप गाजली. सगळ्यांना धडकी भरवणारी ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

कुणी साकारली भूमिका ?

पण तुम्हाला माहिती आहे का ? ही भूमिका कोणी साकारली आहे. ही भूमिका साकारली आहे ती सुनील कुमार यांनी.

'ही' आहे ओळख

सुनील कुमार हा 7 फूट 6 इंच इतका उंच आहे. बॉलीवूड हंगामाने दिलेल्या बातमीनुसार, सुनील जम्मू-काश्मीरच्या पोलीस दलात हवालदार आहे. सुनीलला 'जम्मूचा ग्रेट खली' म्हणून ओळखलं जातं.

कलाकारही घाबरले

सुनील जेव्हा सेटवर आला तेव्हा त्याला पाहून सगळेच कलाकार घाबरले होते. सिनेमातील त्याचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला. राजकुमार रावने ही गोष्ट ट्रेलर लाँचला रिव्हील केली.

म्हणून केली निवड

सिनेमाचे दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले कि,"चित्रपटासाठी खूप उंच असलेल्या व्यक्तीची गरज होती आणि कास्टिंग टीमला सुनील सापडला."

असं तयार केलं कॅरेक्टर

या सिनेमातील सरकाटाचा चेहरा सीजीआयचा वापर करून तयार करण्यात आला आहे पण त्याच्या हालचाली सुनील यांनी केल्या आहेत.

Riteish Deshmukh | Esakal
निक्की हलक्या कानांची - येथे क्लिक करा