संतोष कानडे
पुणे शहरात असलेल्या ससून हॉस्पिटलची कायम चर्चा असते
दीड हजारांपेक्षा जास्त बेडची क्षमता असलेलं हे राज्यातलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे
ससून हॉस्पिटल राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येत नाही
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अखत्यारित हे रुग्णालय येतं
ससून हॉस्पिटलसोबत येथे वैद्यकीय महाविद्यालयदेखील आहे
ससून सर्वसाधारण रुग्णालय व बैरामजी जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालय, असं त्याचं नाव
ससून रुग्णालय १८६७ मध्ये सर डेव्हिड ससून यांच्या दातृत्वातून निर्माण झाले
त्यामुळे या रुग्णालयाला ससून असं नाव देण्यात आलं होतं
आज हे रुग्णालय पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी वरदान ठरलं आहे