Satyajit Ray: परदेशातही कीर्ती गाजवणारे अष्टपैलू सत्यजीत रे

आशुतोष मसगौंडे

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांना कोण ओळखत नाही. अनेक हिट चित्रपट देणाऱ्या सत्यजित रे यांची आज 101 वी जयंती आहे. सत्यजित रे असे कलाकार होते ज्यांची कीर्ती देशातच नाही तर परदेशातही होती.

Satyajit Ray Anniversary

रे यांच्या पहिल्याच चित्रपटाला जवळपास डझनभर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. चार्ली चॅप्लिननंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट मिळविलेल्या चित्रपटसृष्टीशी संबंधित ते एकमेव व्यक्ती होते.

Satyajit Ray Anniversary

कान्स, व्हेनिस, बर्लिन आणि ऑस्कर यांसारख्या जगातील प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित होणारे ते एकमेव भारतीय चित्रपट निर्माते होते.

Satyajit Ray Anniversary

संपूर्ण कारकिर्दीत केलेल्या एकूण तीन डझन चित्रपटांसाठी त्यांना 32 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. 'भारतरत्न' मिळालेले ते आतापर्यंतचे एकमेव चित्रपट दिग्दर्शक आहेत.

Satyajit Ray Anniversary

1955 मध्ये 'पाथेर पांचाली' या चित्रपटाने त्यांचा सिनेसृष्टी प्रवास सुरू झाला असला, तरी शेवटच्या चित्रपट 'अगंतुक' (1992) पर्यंत त्यांचा सिनेसृष्टीचा प्रवास एकूण 37 चित्रपटांपर्यंत चालला.

Satyajit Ray Anniversary

'अपू ट्रायलॉजी' ('पाथेर पांचाली', 'अपराजितो' आणि 'अपर संसार') या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पहिल्या तीन चित्रपटांनी जागतिक चित्रपटसृष्टीतील आघाडीचा चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी नाव कमावले.

Satyajit Ray Anniversary

1947 मध्ये रे यांनी कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली. ते आणि इतर काही चित्रपट रसिक एकत्र भेटायचे आणि जागतिक चित्रपट आणि बंगाली चित्रपटांवर टीकात्मक चर्चा करायचे. ज्याचा त्यांना विरोधही सहन करावा लागला.

Satyajit Ray Anniversary

सत्यजित रे यांचे 23 एप्रिल 1990 रोजी कोलकाता येथे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.

Satyajit Ray Anniversary

चार वर्षांनंतर शिवम दुबेने घेतली IPL मध्ये विकेट!

Shivam Dube | sakal
अधिक पाहाण्यासाठी...