रोहित कणसे
सध्या सुरू असलेल्या टी२० वर्ल्डकपमध्ये यूएसएचा स्टार वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरची चर्चा होताना दिसतेय.
भारतीय वंशाच्या या अमेरिकन खेळाडूने टीम इंडियाविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली, तसंच या सामन्यात सौरभ नेत्रावलकरनं विराट कोहलीविरुद्ध एक खास विक्रमही केला आहे.
टीम इंडियाने हा सामना जिंकला असला तरी पुन्हा एकदा अमेरिकेचा स्टार गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने लाखो क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
सौरभ नेत्रावळकरने भारताविरुद्धच्या सामन्यात सौरभने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची विकेट घेतली.
सौरभने सामन्यात दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
आता आयसीसी स्पर्धेत विराट कोहलीला गोल्डन डकवर बाद करणारा सौरभ पहिला गोलंदाज ठरला असून कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच गोल्डन डकवर बाद झाला आहे.
या सामन्यात सौरभ नेत्रावळकरने गोलंदाजी करताना 4 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले.
सौरभ नेत्रावळकरचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी मुंबईत झालाय.
इतकंच नाही तर सौरभने आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.
मराठी चित्रपटाबद्दल गिरीजाला काय वाटतं?