Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कपमध्ये 6 जून रोजी डेलासला झालेल्या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी पराभूत केले.
अमेरिकेच्या या विजयात वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने मोलाचा वाटा उचलला.
सौरभने पाकिस्तानविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेसाठी गोलंदाजी करताना 19 धावांचा बचाव केला आणि त्याच्या संघाला विजय देखील मिळवून दिला.
त्याआधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने 4 षटकात अवघ्या 18 धावा देत मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांच्या विकेट्स घेतल्या होत्या.
त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, सौरभ फक्त क्रिकेटच खेळत नाही, तर त्याच्या अनेक कलाही आहेत.
सौरभ हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याने कंप्युटर सायन्समध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. सध्या तो अमेरिकेतील ओरॅकल कंपनीत नोकरीला आहे. तो येथे कोडिंगचे काम करतो.
इतकेच नाही, तर त्याला संगीताचीही आवड आहे. तो स्वत: गातो देखील इतकेच नाही, तर त्याला युकुलेले हे वाद्य उत्तमप्रकारे वाजवताही येते.
सौरभला योगाचीही आवड आहे.
सौरभ मुंबईत जन्मलेला असून तिथेच तो क्रिकेट खेळला. तो मुंबई संघाकडूनही क्रिकेट खेळला. मात्र भारतातील स्पर्धा आणि शिक्षणाच्या कारणाने तो २०१५ मध्ये अमेरिकेला आला आणि इथेच स्थायिक झाला.