kimaya narayan
अभिनेत्री सायली संजीव तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेच पण तिचे फोटोशूटही चर्चेत असतात.
नुकतंच सायलीने एक सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं. खण कापडामधील परकर पोलक्यातील तिचा लूक खूप चर्चेत आहे.
लाल रंगाची खणाची अर्धी साडी, पांढऱ्या रंगाचा परकर आणि खणाचा ब्लाउज या लूकमधील सायलीच्या पारंपरिक लूकवर सगळेच फिदा झाले आहेत.
पारंपरिक महाराष्ट्रीयन खणाच्या साड्यांना दिलेला साऊथ इंडियन टच खुलून दिसतोय.
केतकी शाहने सायलीचं हे स्टायलिंग केलं आहे. तिच्या लूकवर अनेकांनी कमेंट करत तिला भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.
सायलीचा आता पाणीपुरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबरोबरच तिचा मनमौजी हा सिनेमाही रिलीज होतोय.
सायलीने शेअर केलेला हा महाराष्ट्रीयन लूक विथ साऊथ ट्विस्ट तुम्हीही ट्राय करू शकता.