घरबसल्या फक्त 10 मिनिटांत उघडा बँक खाते

राहुल शेळके

SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत बचत खाते असण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही तुमचे खाते येथे 10 मिनिटांत उघडू शकता.

SBI Saving Account | Sakal

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तुम्हाला 10 मिनिटांत खाते उघडण्याची सुविधा देत आहे. यासाठी व्हिडीओ केवायसीची सेवा सुरू केली आहे.

SBI Saving Account | Sakal

तुम्हाला एसबीआयमध्ये 10 मिनिटांत खाते उघडायचे असल्यास. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये SBI YONO ॲप डाउनलोड करावे लागेल.

SBI Saving Account | Sakal

या ॲपमध्ये तुम्हाला सर्वप्रथम New to SBI पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ओपन अकाउंट विदाऊट ब्रँच व्हिजिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

SBI Saving Account | Sakal

यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा तपशील द्यावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर मिळालेला OTP टाकावा लागेल.

SBI Saving Account | Sakal

OTP टाकल्यानंतर, तुम्हाला काही वैयक्तिक आणि संपर्क तपशील विचारले जातील. यानंतर तुम्हाला व्हिडिओ कॉल करावा लागेल. तुमचा व्हिडिओ केवायसी शेड्यूल करेल.

SBI Saving Account | Sakal

तुम्हाला नियोजित वेळी योनो ॲपवर लॉग इन करावे लागेल. यानंतर तुमचा व्हिडिओ केवायसी पूर्ण होईल. तुमचे काम इथेच संपेल. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होईल.

SBI Saving Account | Sakal

तुमची व्हिडिओ केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बँक अधिकारी त्याची पडताळणी करतील. यानंतर तुम्ही तुमच्या खात्यातून व्यवहार करू शकाल.

SBI Saving Account | Sakal

मोबाईलमध्ये नेटवर्क येत नाही! या टिप्समुळे नक्की होईल फायदा

No network in mobile | Sakal
येथे क्लिक करा