Saisimran Ghashi
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स सध्या अंतराळात अडकून आहेत.
अशात आपल्याला प्रश्न पडतो की ते अंतराळात गेलेले अंतराळवीर काय खात-पीत असतील? तर त्यांना पॅकेज फूड दिले जाते.
परंतु महत्त्वाची बाब म्हणजे अंतराळात गेल्यानंतर अन्नाची चवच कळत नाही असं का याचं कारण जाणून घेऊया.
अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्यामुळे नाक बंद होते आणि त्यांना अन्नाचा सुगंध नीट येत नाही.
अंतराळातील वातावरण पृथ्वीवरील वातावरणापेक्षा वेगळे असते आणि त्यामुळे अन्नाची चवही वेगळी वाटते.
लांब अंतराळ मोहिमेमुळे एकाकीपणा आणि तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे भूक कमी होऊ शकते आणि अन्नाची चवही बदलू शकते.
अंतराळात राहिल्याने शरीरात अनेक बदल घडतात, जसे की स्नायूंची कमतरता आणि रक्ताभिसरणात बदल. हे बदलही भूक आणि चव यांवर परिणाम करू शकतात.
अंतराळात अन्न लहान पॅकेटमध्ये साठवले जाते आणि ते डिहायड्रेट किंवा फ्रीज केले जाते. यामुळे अन्नाची पोत आणि चव बदलू शकते.
अंतराळवीरांना चांगले अन्न मिळण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून शास्त्रज्ञ सतत प्रयत्न करत आहेत.