Saisimran Ghashi
आपल्या अनेक लहान-मोठ्या सवयींचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अशीच एक सवय म्हणजे अन्न खाण्यापूर्वी किंवा नंतर पाणी पिणे.
आपल्या मनात एक प्रश्न नेहमी येतो की आपण अन्न खाल्ल्यानंतर किती वेळ किंवा आधी पाणी प्यावे, कारण हा प्रश्न थेट आपल्या आरोग्याशी संबंधित आहे.
तर चला जाणून घेऊया याचे कारण.
आयुर्वेदानुसार, अन्न खाण्यापूर्वी आणि नंतर लगेच पाणी पिणे टाळावे. कारण पाणी पचनरसाचे प्रमाण कमी करते आणि पचनक्रिया कठीण करते.
अनेक डॉक्टरांचा असा सल्ला आहे की आपण जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर एक ते दीड तास पाणी प्यावे.
पचनाची प्रक्रिया कठीण होते. गॅस, ॲसिडिटी सारखे त्रास होऊ शकतात.पोषक तत्वांचे शोषण कमी होते.
तोंड आणि घसा स्वच्छ राहतो,अन्न सहज गिळता येते,पोटातील आग कमी करते.
तहान लागल्यास, थोड्या प्रमाणात घुटके घुटके पाणी प्या. जेवणापूर्वी आणि नंतर अर्धा तास पाणी पिणे टाळा.
प्रत्येक व्यक्तीची शरीराची रचना आणि चयापचय वेगळा असतो.जेवताना पाणी पिणे टाळणे चांगले. गरज भासल्यास, थोड्या प्रमाणात घुटके घुटके पाणी प्या.
आहार आणि पाण्याचा योग्य समतोल राखणे हे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.