Saisimran Ghashi
रात्रीची भयानक स्वप्ने पडणे किंवा दचकून जागे होण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते.
यामागची वैज्ञानिक कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दिवसभरातील मानसिक ताण किंवा चिंता रात्री भीतीदायक स्वप्नांचे रूप घेते.
अपूर्ण किंवा अस्थिर झोपेमुळे मेंदूला योग्य विश्रांती मिळत नाही, ज्यामुळे भयानक स्वप्ने येतात.
डिप्रेशन, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) यासारख्या समस्यांमुळे भयानक स्वप्ने अधिक येतात.
हॉरर किंवा हिंसात्मक चित्रपट किंवा कथा वाचल्याने मेंदू भितीदायक विचारांमध्ये अडकतो.
मद्य किंवा नशेच्या गोष्टींमुळे झोपेची गुणवत्ता खालावते आणि स्वप्नांचा अनुभव विचित्र होतो.
स्लीप अॅपनिया, नाइट टेरर किंवा रॅपिड आय मूव्हमेंट (REM) डिसऑर्डरमुळे स्वप्नांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण होते.