Sudesh
बऱ्याच वेळा आपले जुने कपडे फाटले नसताना देखील ते वापरु वाटत नाहीत.
अशा वेळी बरेच लोक जुने कपडे दान करण्याचा पर्याय अलवंबतात.
मात्र, अशा जुन्या कपड्यांना ऑनलाईन विकून तुम्ही त्या माध्यमातून पैसेही कमवू शकता.
ओएलएक्स या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच सेकंड हँड गोष्टी विकता येतात. यातच फॅशन कॅटेगरीमध्ये तुम्ही जुने कपडेही लिस्ट करू शकता.
क्विकर या प्लॅटफॉर्मवर देखील तुम्ही आपले जुने कपडे विकू शकता. यासाठी क्विकरच्या मुख्य वेबसाईटवर जाऊन फॅशन हा पर्याय निवडा, आणि तुमचे कपडे लिस्ट करा.
याव्यतिरिक्त तुम्ही इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर पेज तयार करुन त्यावरही आपले जुने कपडे विकू शकता. यासाठी तुम्हाला या कपड्यांचे चांगले फोटो काढून ते पोस्ट करावे लागतील.
कोणत्याही ठिकाणी कपडे लिस्ट करण्यापूर्वी ते सुस्थितीत असल्याची खात्री करा. तसंच त्यांचे अधिक आकर्षक फोटो काढा, जेणेकरून ते विकले जाण्याची शक्यता वाढेल.