राहुल शेळके
इन्फोसिसची स्थापना 1981 मध्ये सात लोकांनी एका खोलीतून केली होती, नंतर कंपनी बंगळुरूला स्थलांतरित झाली.
कंपनीच्या सहसंस्थापकांमध्ये नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, ख्रिस गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल, के दिनेश आणि एनएस राघवन यांचा समावेश होता.
इन्फोसिसचे सह-संस्थापक सेनापती गोपालकृष्णन यांनी नारायण मूर्ती यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे.
हुरुन इंडियाच्या मते, सेनापती यांच्याकडे 38,500 कोटी रुपयांची संपत्ती आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना यादीत पाचवे स्थान मिळाले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेल्या नारायण मूर्ती यांची एकूण संपत्ती 36,600 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
सेनापती 'ख्रिस' गोपालकृष्णन हे इन्फोसिसच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी 2007 ते 2011 पर्यंत बहुराष्ट्रीय कंपनी इन्फोसिसमध्ये सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले.
2011 ते 2014 या काळात त्यांनी इन्फोसिसमध्ये उपाध्यक्षपद भूषवले. 69 वर्षीय गोपालकृष्णन हे सध्या एक्सिलॉर व्हेंचर्सचे अध्यक्ष आहेत.
गोपालकृष्णन यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास येथे संगणक शास्त्राचा अभ्यास केला.
2011 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. गोपालकृष्णन यांनी सुधा गोपालकृष्णन यांच्याशी लग्न केले.