Pranali Kodre
सार्बियामध्ये 22 मे 1987 साली जन्मलेला टेनिसपटू नोवाक जोकोविच सर्वात यशस्वी टेनिसपटूंमध्ये गणला जातो.
त्याच्या नावावर विक्रमी 24 ग्रँडस्लॅमची नोंद आहे. त्याने आत्तापर्यंत टेनिसमध्ये मिळवलेल्या मोठ्या यशामुळे त्याची कमाई देखील कोट्यवधींची आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार जोकोविचचे नेट वर्थ 2024 पर्यंत जवळपास 250 मिलियन डॉलर इतके आहे.
त्याने खेळलेल्या स्पर्धांमधून तब्बल 182,011,060 डॉलर बक्षीस रक्कम जिंकली आहे.
याशिवाय तो अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करतो. तसेच त्याच्या मोठ्या कंपन्यांबरोबर स्पॉन्सरशीपचे करार आहेत.
त्याचबरोबर त्याने व्यायसायातही गुंतवणूक केलेली असून त्याने 2005 मध्ये फॅमिली स्पोर्ट्स या कंपनीची स्थापना केली होती. त्याचे काही कॅफे आणि रेस्टॉरंट्सही आहेत.
याशिवाय सध्या तो सध्या मॉन्टे कार्लो, मोनॅको येथे राहत असून तिथे त्याचे मोठे घर आहे. तसेच सार्बियातील बेलग्रेड येथे पेंटहाऊस असून अमेरिकेतही त्याचे आलिशान घर असल्याचे सांगितले जाते.
जोकोविचकडे महागड्या कार देखील आहेत. तसेच त्याने 2007 मध्ये जोकोविच फाउंडेशनची स्थापना केली, ज्यातून गरिब आणि दिव्यांग लहान मुलांना मदत केली जाते.
जोकोविचला अनेक भाषांचे ज्ञान असून तो सर्बियन, इंग्लीश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पॅनिश, जपानी, रशियन, चायनिज, पोर्तुगीज भाषा बोलू शकतो.