जेवणात हिंग वापरणं का महत्त्वाचं आहे? जाणून घ्या

Aishwarya Musale

मसाला

भारतीय मसाल्यांमध्ये प्रत्येक मसाल्याचा स्वतंत्र असा एक गुणधर्म आहे. त्यातही हिंगाला सर्वाधिक महत्त्व आहे. हा मसाला केवळ सुगंधासाठीच नाही तर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखला जातो.

हिंग

यामुळेच भारतीय स्वयंपाकघरात हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आयुर्वेद तज्ञ देखील आपल्या आहारात हिंग समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.

आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने हिंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः पोटासाठी हिंग खूप फायदेशीर आहे. हे पाचक एन्झाईम्स वाढवून पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

पचनाची काळजी घ्या

ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी हिंगाचा वापर नक्की करावा. यामुळे पोट फुगत नाही, जळजळ होत नाही तसेच अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. याशिवाय डोळ्यांच्या आजारांमध्ये हे खूप फायदेशीर ठरू शकते.

रोज किती हिंग खाऊ शकता?

तुम्ही दररोज तुमच्या आहारात साधारण 250 मिलीग्राम हिंग समाविष्ट करू शकता. तसेच, ज्या लोकांना रक्तस्त्राव किंवा मज्जासंस्थेचे विकार आहेत त्यांनी हिंग खाणे टाळावे.

रिकाम्या पोटी

तुम्ही रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर चिमूटभर हिंग खाऊ शकता. यासाठी तुम्ही 1 ग्लास पाणी गरम करून त्यात हिंग घालून त्याचं सेवन करू शकता.

आजार

मात्र, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर हिंग खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

आहार

अशा प्रकारे जर तुम्ही हिंगाचा तुमच्या आहारात वापर केला तर तुमच्या अनेक समस्या दूर होतील. 

उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे घरगुती पेय रामबाण उपाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा