सकाळ डिजिटल टीम
सेक्स लाईफ म्हणजे केवळ विशिष्ट कृती नव्हे. लैंगिक सुखाविषयी बोलणं, रोमान्स हे सारं त्या क्रियेतला सुखद भाग आहे. त्यामुळे लैंगिक जीवन आणखी चांगले होऊ शकते.
स्पर्श समजून घ्या- तुमच्या जोडीदाराचे शरीर जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला कुठे स्पर्श करायला आवडते तेही जाणून घ्या.
काहींना मानेवर तर काहींना पायावर चुंबन घेणे आवडते. तुमच्या जोडीदाराला काय आवडते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना याबाबत पत्नीचं मत जाणून घ्या.
रोमँटिक बोलणं कितपत आवडतं तेही जाणून घ्या. काहींना अति रोमँटिक बोलणं अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला जे आवडत नाही ते बोलू नका.
टीव्हीवर दाखवल्याप्रमाणेच सेक्स किंवा रोमँटिक होण्याची आशा जोडीदाराकडून ठेवू नका.
रोमँटिक व्हा - बेडरुममधलं, वातावरण, फुलं, सिनेमा, दोघांनी एकत्र जेवणे, गप्पा हे सारं रोमॅण्टिक असणंही जोडीदाराला आवडत असेल तर ते करा.
घाई करू नका- सेक्स केल्यानंतर उठण्याची घाई करू नका. महिलांना अनेकदा सेक्स केल्यानंतर जोडीदाराला बिलगून झोपावेसे वाटते. कदाचित तुमच्या जोडीदाराचीही तिच इच्छा असू शकते. ते समजून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.