आशुतोष मसगौंडे
काही दिवसांपूर्वी शबाना आझमी यांनी एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यांनी मिजवान, आझमगडच्या श्वेता प्रजापतीचे कौतुक केले होते.
शबाना म्हणाल्या होत्या की, श्वेता प्रतिभावान आहे. जेव्हा कास्टिंग डायरेक्टरला एखाद्याला कास्ट करायचे असते तेव्हा तो नवीन कलाकारामध्ये काय पाहतो, हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
शबाना म्हणाल्या, "मी तिचा फोटो पाहिला आणि मला वाटले की हिचा विचार केला पाहिजे."
कास्टिंग डायरेक्टर्सनी मला सांगितले होते की, सर्व मुली मेक अप करून येतात, त्या ग्लॅमरस दिसतात. पण, त्यांना मेकअपशिवाय मुली पहायच्या असतात."
शबाना आझमी म्हणाल्या की, "ज्या तरुणीचा त्यांनी फोटो पोस्ट केला होता तिला त्या ती सहावीत असल्यापासून ओळखत होत्या.“
शबाना आझमी यांनी असेही सांगितले की पूर्वीच्या तुलनेत, कनेक्शनच्या आधारे चित्रपटात ब्रेक मिळवणे सोपे आहे.
शबाना पुढे म्हमाल्या, "कनेक्शनवर अवलंबून, तुम्हाला पहिल्यांदा ब्रेक मिळू शकतो, परंतु जर प्रेक्षकांनी तुम्हाला नाकारले तर तुम्ही काहीच नसता."
आझमी यांनी इंडस्ट्रीत येणाऱ्या नवीन कलाकारांना सल्ला दिला की, "कास्टिंग डायरेक्टर चेहरा शोधत असतात, ग्लॅमर किंवा मॉडेल लूक नाही."