रोहित कणसे
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामी जोडी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी महिला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी शेफाली अन् स्मृतीने 250 धावांची दमदार सलामी देत विश्वविक्रमाला गवसणी घातली.
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या आधी महिला कसोटी क्रिकेटच्या 90 वर्षाच्या इतिहासात कोणत्याही सलामी जोडीला पहिला विकेटसाठी 250 धावांची सलामी देता आली नव्हती.
चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात स्मृती आणि शफाली या भारताच्या सालमी जोडीनं दमदार सुरूवात केली.
स्मृती मानधना आणि शफली वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पहिल्या दोन सत्रातच जेरीस आणलं.
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघींनी आक्रमक फलंदाजी करत 292 धावांची खणखणीत सलामी दिली.
या पार्टनरशीपमध्ये स्मृती मानधनाचे 149 धावांचे योगदान राहिले. तिचे दीडशतक अवघ्या एक धावेने हुकले.
दुसरीकडे शफाली वर्माने 150 धावा करत आपलं पहिलं वहिलं कसोटी शतक झळकावलं.
या सामन्यादरम्यान स्मृती मानधनाने कसोटीतील आपल्या 500 धावा देखील पूर्ण केल्या. विशेष म्हणजे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 500 धावा करणारी स्मृती ही फक्त दुसरी बॅटर आहे.
स्मृतीने मितालीचा अजून एक विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम मोडत स्मृतीने कसोटीत 90 चौकार ठोकलेत.
तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ होममेड स्किन टोनर ट्राय करून बघा