शाहरुख-समांथा पहिल्यांदाच एकत्र दिसणार सिनेमात

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि साऊथ सुपरस्टार लेडी समांथा रूथ प्रभू एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे.

शाहरुख आणि समांथा

नुकतंच फिल्मफेअर वेबसाईटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी म्हटलंय कि, शाहरुख आणि समांथा हे राजकुमार हिरानींच्या आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

पुन्हा एकदा देशभक्तीपर सिनेमा

पुन्हा एकदा शाहरुख देशभक्तीपर सिनेमात दिसणार असून या सिनेमाचीही निर्मिती तो स्वतः करणार आहे.

गाजलेल्या सिनेमांची हॅट्रिक

गेल्या काही काळापासुन शाहरुख देशभक्तीपर सिनेमात काम करत असून त्याचे 'जवान','पठाण' आणि 'डंकी' हे सिनेमे चांगले गाजले.

पहिल्यांदाच एकत्र

शाहरुख आणि समांथा पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत.

लवकर होणार घोषणा

या सिनेमाचं शीर्षक अजून ठरलं नसून लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

हॉलिवूडमध्ये पदार्पण

या व्यतिरिक्त ती आता हॉलिवूडमध्ये डेब्यू करत असून सिटाडेलच्या हिंदी व्हर्जनमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने साकारलेली भूमिका साकारणार आहे.

चाहते उत्सुक

चाहते शाहरुख आणि समांथाला एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत.

येथे क्लिक करा