आशुतोष मसगौंडे
1957 च्या निवडणुकीत ताज मोहम्मद खान यांनी काँग्रेस नेते अबुल कलाम आझाद यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते शाहरुख खानचे वडील होते.
सर्वात कमी आणि सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रमही या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर आहे.
या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एकही उमेदवार असा होता की ज्यांना एक मतही मिळू शकले नव्हते.
हे उमेदवार चित्रपट अभिनेता शाहरुख खानचे वडील ताज मोहम्मद होते. पाकिस्तानचे रहिवासी असलेले ताज मोहम्मद फाळणीनंतर दिल्लीत आले आणि स्थायिक झाले.
गुरुग्राम लोकसभेची पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली होती. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार ठाकूर दास भार्गव हे विजयी झाले होते.
देशातील दुसऱ्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अबुल कलाम आझाद यांना 1,91,221 मते मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी बीजेएसचे उमेदवार मूल चंद यांना 95,553 मते मिळाली.
या निवडणुकीत विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार ताज मोहम्मद यांना एकही मत मिळाले नाही. हा एक विक्रम आहे. ताज मोहम्मद हे शाहरुख खानचे वडिल होते.
दुसऱ्या लोकसभेसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे अबुल कलाम आझाद यांना 1,91,221 मते आणि त्यांचे प्रतिस्पर्धी बीजेएसचे उमेदवार मूल चंद यांना 95,553 मते मिळाली. तर शाहरुखच्या वडिलांना एकही मत नव्हते.
विशेष म्हणजे अबुल कलाम आझाद हे अभिनेता आमीर खानचे पंजोबा होते.