संतोष कानडे
कर्नाटकातलं बंगळुरू शहर एक आयटी हब म्हणून ओळखलं जातं
हे शहर जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख टिकवून आहे, त्याला कारण आहे शहाजीराजे भोसले यांची दूरदृष्टी
विजयनगर साम्राज्यात बंगळुरु हे केवळ एक खेडं होतं
विजयनगर साम्राज्यातला एक सरदार केंपेगौडा याने १५३७ मध्ये हे गाव वसवलं
आदिलशाहीत असलेल्या शहाजीराजेंच्या पराक्रमामुळे हा परिसर जहागिरीत त्यांना मिळाला
शहाजीराजांनी बंगळुरुला आपल्या जहागिरीची राजधानी बनवलं
अवघं भोसले कुटुंब बंगळुरुमध्ये एकत्र रहात होतं, पुढे शिवबा आणि जिजाऊ माँसाहेब पुण्याची जहागिरी सांभाळायला गेले
शहाजीराजांनी बंगळुरुमध्ये अनेक बागा उभारल्या, गावची तटबंदी मजबूत केली, व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं
याशिवाय मंदिरांचा जिर्णोध्दार करुन महाराष्ट्रातून ब्राह्मणांना पाचारण केलं, अनेक विहिरी बांधल्या
पुढे शहाजीराजांनी अनेक विद्वानांना दरबारात मानाचं स्थान दिलं, भाषा तज्ज्ञांना प्रोत्साहन दिलं
त्यामुळे बंगळुरुला राजधानीचं स्वरुप आलं, अनेक मराठी कुटुंबं या शहरात वास्तव्याला गेली आणि बंगळूरुचं नाव दिल्लीपर्यंत गेलं