Aishwarya Musale
तुमच्या दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये शॅम्पूलाही खूप महत्त्व आहे. दर महिन्याला प्रत्येक घरात शॅम्पूचा भरघोस वापर होतोच.
अनेकांना नेहमीच्या वापरातला शॅम्पू हा एक-दोन रुपयांना मिळणाऱ्या सॅशेच्या रूपात विकत घ्यायला आवडतो, तर अनेकजण शॅम्पूची एकच बॉटल खरेदी करणं पसंत करतात.
शॅम्पूचा सॅशे खरेदी करायचा की बॉटल? यामागे लोकांचे वेगवेगळे तर्क असतात आणि त्यामुळे लोक वेगवेगळ्या स्वरुपात शॅम्पूची खरेदी करतात. अनेकजण पैसे कसे वाचतील? हे लक्षात घेऊन शॅम्पू खरेदी करतात.
शॅम्पूच्या पाऊचमध्ये जास्त शॅम्पू मिळतो की बॉटलमध्ये? यावर अनेकदा वाद होत असतो. अनेकजण शॅम्पूचा पाऊच कुठेही सहज नेता येत असल्याने आणि कमी जागा घेत असल्याने पाऊचला पसंती देतात.
शॅम्पूचे एक-दोन रुपयांचे सॅशे वापरणं नेहमी फायदेशीर ठरतं, याचं एक कारण म्हणजे, एका वेळी किती शॅम्पू वापरायचा याचा अंदाज आपल्याला येतो.
हेच जर शॅम्पूच्या बॉटलबद्दल बोलायचं झालं तर बॉटलमध्ये आपल्याला शॅम्पूचा अंदाज येत नाही आणि आपण भरमसाठ शॅम्पू वापरतो, ज्यामुळे बॉटल लवकर संपते आणि पुन्हा आपल्याला खरेदी करावी लागते.
जर तुम्ही पाउचमध्ये/सॅशेमध्ये शॅम्पू खरेदी केला तर शॅम्पू जास्त मिळतो, जे खूप फायदेशीर आहे.
पाऊचमधील शॅम्पू खरेदी करुन तुम्ही कमी पैशात बॉटलपेक्षा जास्त शॅम्पू खरेदी करू शकता. शॅम्पूच्या सॅशेमध्ये बॉटलपेक्षा जास्त शॅम्पू मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.