Anuradha Vipat
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे
आता आणखी एका कलाकाराने या मालिकेला रामराम केल्याची जोरदार चर्चा आहे.
या मालिकेत अब्दुलची भूमिका साकारणारा अभिनेता शरद सांकलाने शो सोडल्याचं म्हटलं जात आहे.
आता या चर्चांवर अखेर शरदने प्रतिक्रिया दिली आहे.
शरदने म्हटलं आहे की, मी अजूनही तारक मेहता.. या मालिकेत काम करतोय आणि यापुढेही करत राहणार आहे.
पुढे शरदने म्हटलं आहे की, मी मालिका सोडल्याच्या चर्चा खोट्या आहेत. मी कुठेच गेलो नाही.
पुढे शरदने म्हटलं आहे की, अब्दुलच्या भूमिकेमुळे मला लोकप्रियता मिळाली आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.