Navratri Festival : अंबाबाईची कुष्मांडा देवीच्या रूपात पूजा; तुळजाभवानी, त्र्यंबोली देवीनंही वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

अंबाबाईची कुष्मांडा रूपात पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बुधवारी श्री अंबाबाई देवीची कुष्मांडा स्वरूपातील पूजा बांधण्यात आली. श्री पूजक आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, चैतन्य मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी ही पूजा बांधली. (फोटो - मोहन मेस्त्री)

Shardiya Navratri Festival 2023

वनविहार रूपात पूजा

छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भवानी मंडपमधील श्री तुळजाभवानी देवीची चौथ्या दिवशी वनविहार रूपात पूजा बांधली.

Shardiya Navratri Festival 2023

गजलक्ष्मी रुपात सालंकृत पूजा

त्र्यंबोली देवीची बुधवारी गजलक्ष्मी रुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. संतोष गुरव, सदानंद गुरव, रोहित गुरव, ओंकार गुरव यांनी ही पूजा बांधली.

Shardiya Navratri Festival 2023

शृंगेरी शारदांबा रुपात पूजा

वडणगे : करवीर काशी अशी ओळख असलेल्या वडणगे येथील पार्वती देवीची बुधवारी शृंगेरी शारदांबा रुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.

Shardiya Navratri Festival 2023

यशोदा मातेच्या रूपात पूजा

कोडोली (ता. पन्हाळा) : येथील अंबाबाई मंदिरातील मूर्तीची शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी यशोदा मातेच्या रूपात बांधलेली सालंकृत पूजा.

Shardiya Navratri Festival 2023

हंस वाहिनी रूपात पूजा

पन्हाळा : येथील श्री अंबाबाईची चौथ्या दिवशीची हंस वाहिनी रूपात बांधलेली पूजा. (फोटो : धीरज कुराडे, पन्हाळा)

Shardiya Navratri Festival 2023

व्याघ्रारूढ स्वरूपात बांधलेली पूजा

राशिवडे : चौथ्या माळेला येथील देवीची व्याघ्रारूढ स्वरूपात बांधलेली पूजा. (फोटो - राजू कुलकर्णी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardiya Navratri Festival 2023