Payal Naik
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर घराघरांत पोहोचला.
तो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
त्याच्या या मालिकेतील भूमिकेलाही प्रेक्षकांना अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे.
शशांक सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो त्याच्या वैयक्तिक गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
अशातच त्याची पत्नी प्रियांका हिने शशांकचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शशांकने लाडक्या बायकोसाठी खास बिर्याणी बनवली होती. त्याचा फोटो तिने शेअर केला आहे.
तिने बिर्याणीबरोबर शशांकचा फोटो पोस्ट करत “व्हेज बिर्याणी शेफ बाय शशांक केतकर”, असं म्हटलं आहे.
शशांक हा उत्तम अभिनेता तर आहेच सोबतच तो एक चांगला पती आणि एक चांगला बाबा देखील आहे.