Anuradha Vipat
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर
शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.
मुंबईतील फिल्मसिटीजवळ असलेल्या रस्त्यावरील कचरा दाखवत त्याने प्रशासनाला आणि नागरिकांनाही प्रश्न विचारला आहे
काठावरचा इंजीनिअर.. ही अवस्था टाऊन प्लॅनिंग करणाऱ्यांची आहे, आपल्या शहरातला कचरा मॅनेज करणाऱ्यांची आहे’, असं म्हणत प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला आहे.
शशांकने त्याच्या या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगरपालिकेलाही टॅग केलं आहे
मेरा भारत महान. मोदीजी असोत, राहुलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाहीये असंही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे
येणारे पर्यटक, कलाकार आणि तिथे राहणारे नागरिक, सगळ्यांच्या माथी हा असला घाणेरडा परिसर का मारला आहे,’ असा संतप्त सवाल शशांकने या पोस्टद्वारे केला आहे.