Anuradha Vipat
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
आंतरधर्मीय लग्न करत असल्यामुळे तिच्यावर मोठी टीका करण्यात आली होती.
आता शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडीओ तुफान चर्चेत आहे
या व्हिडीओमध्ये शत्रुघ्न सिन्हांनी आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत
शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले आहे की, सोनाक्षी आणि झहीर हे एकमेकांसाठी बनलेले आहेत. लोकांनी काहीही म्हणण्याचा प्रयत्न केला, मात्र आमच्यासाठी आमच्या मुलांचा आनंद सर्वोच्च आहे. विशेष म्हणजे आमच्या मुलीचा आनंद आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
पुढे शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले आहे की, लोकांनी काहीही म्हणण्याचा प्रयत्न केला मात्र आमच्यासाठी आमच्या मुलांचा आनंद सर्वोच्च आहे. विशेष म्हणजे आमच्या मुलीचा आनंद आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
पालक आपल्या मुलांसाठी खूप काही करतात आणि मुलीसोबत खंबीरपणे उभे राहणे हा छोटा वाटा आहे. ती नेहमी म्हणते, माझे वडील माझ्या शक्तीचा आधारस्तंभ आहे. असंही पुढे शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले आहे