Anuradha Vipat
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल २३ जून रोजी लग्न करणार आहेत.
सोनाक्षीने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल तिचे वडील काय विचार करतात याबाबत सांगितलं होतं.
सोनाक्षीने तीन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सोनाक्षीच्या लग्नाबद्दल तिच्या कुटुंबाचा दृष्टीकोन काय आहे, हे तिने सांगितलं होतं.
तिने अविवाहित राहावं असं तिच्या वडिलांना वाटतं, तर तिची आई अधूनमधून लग्नाचा सल्ला देते, असं सोनाक्षीने म्हटलं होतं.
“माझ्या लग्नाचा निर्णय वडिलावर अवलंबून असेल तर मी लग्न करावं असं त्यांना कधीच वाटणार नाही असंही या मुलाखतीत सोनाक्षीने म्हटलं होतं.
माझी आई कधी-कधी म्हणत असते की तू लग्न करून घ्यायला पाहिजे. पण मग मी तिला एक लूक देते आणि ती म्हणते अच्छा ठिक आहे,” असं सोनाक्षी त्या मुलाखतीत म्हणाली होती.
आता लग्नाच्या निर्णयाबाबत आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सोनाक्षीने आनंद व्यक्त केला आहे