Pranali Kodre
भारताचा स्टार फलंदाज शिखर धवनने २४ ऑगस्ट रोजी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.
शिखर धवनने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा मोठ्या खेळी केल्या आहेत आणि त्याच्या संघाचा विजय मिळवून दिला आहे.
शिखरला आयसीसी स्पर्धांचा मोठा खेळाडू असंही म्हटलं जातं, कारण त्याने आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमीच मोठी कामगिरी केली आहे.
तो आयसीसीच्या २००४ U19 वर्ल्ड कप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तसेच त्याने २०१५ वर्ल्ड कप, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.
शिखर धवनने ३४ कसोटीत ४०.६१ च्या सरासरीने ७ शतके आणि ५ अर्धशतकांसह २३१५ धावा केल्या.
शिखरने १६७ वनडेत ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या आहेत. त्याने १७ शतके आणि ३९ अर्धशतके केली आहेत.
शिखरने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ६८ सामन्यांमध्ये ११ अर्धशतकांसह १७५९ धावा केल्या आहेत.
शिखरने २२२ आयपीएल सामन्यांमध्ये २ शतके आणि ५१ अर्धशतकांसह ६७६८ धावा केल्या आहेत.