भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये शिखर धवन; 'गब्बर' किती श्रीमंत आहे?

राहुल शेळके

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने आज शनिवारी 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Shikhar Dhawan | X/IPL

यासह त्याची 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. धवनने या 14 वर्षांत भारतासाठी चमकदार कामगिरी केली.

Shikhar Dhawan | sakal

टीम इंडियाचा पगार, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर माध्यमं हे त्याच्या कमाईचे स्रोत होते, ज्याच्या आधारावर त्याची टीम इंडियाच्या श्रीमंत खेळाडूंमध्ये गणना होते.

Shikhar Dhawan | Cricket | Sakal

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. या खेळात चांगली कामगिरी करणारे क्रिकेटपटूही भरपूर कमाई करतात. या बाबतीत विराट कोहली आघाडीवर आहे.

Shikhar Dhawan

याशिवाय महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांसारखे अनेक दिग्गज क्रिकेटपटू भारतातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत आहेत.

Shikhar Dhawan | Cricket | Sakal

शिखर धवन गेल्या काही वर्षांत टीम इंडियाचा भाग नाही, तरीही त्याच्या नावाचा समावेश सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंमध्ये होतो.

Shikhar Dhawan | Cricket | Sakal

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, शिखर धवनची एकूण संपत्ती अंदाजे 17 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 142 कोटी रुपये) आहे.

Shikhar Dhawan | Cricket | Sakal

शिखर धवन अनेक प्रकारचे ब्रँड एंडोर्समेंट करतो, ज्यात Jio, Nerolac Paints, GS Caltex, Lay's, Oppo, Boat सारख्या अनेक मोठ्या कंपन्या आहेत. बीसीसीआयचा पगार हाही त्याच्या कमाईचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Shikhar Dhawan | Instagram

पण त्याने आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक पैसा आयपीएलमधून कमावला. धवनने 2008 पासूनच आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली होती. 16 सीझनमध्ये त्याने एकूण 91.8 कोटी रुपये कमावले.

Shikhar Dhawan | X/IPL

शिखर धवनकडे आलिशान गाड्यांचे चांगले कलेक्शन आहे. त्याच्याकडे मर्सिडीज GL350 CDI आणि एक Audi आहे. याशिवाय त्याच्याकडे Harley Davidson Fat Boy, Suzuki Hayabusa, Kawasaki Ninja ZX-14R सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत.

Shikhar Dhawan | Cricket | Sakal

ICC स्पर्धांचा मोठा खेळाडू; कशी राहिली शिखर धवनची कारकिर्द?

Shikhar Dhawan | Cricket | Sakal
येथे क्लिक करा