प्रणाली मोरे
सध्या झी मराठीवर 'तू तेव्हा तशी' मालिकेत शिल्पा तुळसकर 'अनामिका' ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिनं अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.
मालिकेतील शिल्पाची ड्रेसिंग स्टाईल सध्या सगळ्यांनाच भुरळ घालत आहे.
नुकताच मालिकेचा एक प्रोमो रिलीज झाला,त्यात शिल्पानं छान काठापदराची साडी अन् नथीचा साजशृंगार करत अनेकांवर आपल्या सौंदर्याची मोहिनी घातली आहे.
शिल्पा तुळसकरची स्माईल हा तिचा युएसपी आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी मोठं आकर्षण ठरत आहेत.
शिल्पा तुळसकर हे नाव केवळ मराठीत नाही तर हिंदीतही अनेक गाजलेल्या मालिकांशी जोडलेलं आहे. आज वयाच्या पंचेचाळीशीतही तिनं आपलं सौंदर्य जपलंय याला दाद नक्कीच द्यावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.